Tuesday 19 December 2017

जीसटी – इलेक्ट्रॉनिक वाहतूक बील


इलेक्ट्रॉनिक वाहतूक बील

जीसटीच्या २४ व्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे १६ जानेवारी २०१८ पासून चाचणी आधारावर ई-वे बीलच्या तरतुदी राष्ट्रव्यापी लागू करण्यात येतील.  व्यापारी आणि वाहतूकदार हे दिनाक १६ जानेवारी २०१८ पासून ऐच्छिक तत्वावर ही प्रणाली वापरणे सुरु करू शकतात.  आंतरराज्यीय वस्तूंच्या वाहतूकीसाठी राष्ट्रव्यापी अंमलबजावणीचे हे धोरण अनिवार्य तत्वावर १ फेबुवारी २०१८ पासून अधिसूचित केले जातील.  त्यामुळे वस्तूंच्या आंतरराज्यीय अंखंड हालचाली मध्ये एकसारखेपणा येईल. 

इलेक्ट्रॉनिक वाहतूक बील हे वस्तूंच्या हालचालीचा पुरावा देणारे, जीसटी पोर्टलवर निर्माण झालेले इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे.  यात दोन घटक असतात.  भाग “ अ “ मध्ये प्राप्तकर्त्याचा जीसटीआयएन, पिनकोड पावती क्रमांक आणि दिनांक, वस्तूंचे मूल्य, एचएसएन कोड, वाहतूक दस्तऐवज क्रमांक, वाहतूकीचे कारण इत्यादी तपशील द्यावा.  भाग “ ब “ मध्ये वाहतूकदारांचा तपशील द्यावा लागेल.

सीजीएसटी नियमानुसार, जर कनसाईनमेन्टचे मूल्य ५०००० रुपयापेंक्षा जास्त असेल तर नोंदणीकृत व्यापाऱ्याला ई-वे बीलाच्या भाग “ अ “ मध्ये तपशील दाखल करणे आवश्यक आहे. 

वाहतूक जर स्वत:च्या किंवा भाड्याने घेतलेल्या वाहनांमधून होत असेल तर कनसाईनर किंवा कनसाईनी यांनी स्वत: ई-वे बील निर्माण करावे.  जर वस्तूं वाहतूकीसाठी वाहतूकदारांकडे पाठवल्या तर वाहतूकदारांने ई-वे बील निर्माण करावे.  जिथे कनसाईनर किंवा कनसाईनी दोघेही ई-वे बील निर्माण करत नसतील आणि वस्तूंचे मूल्य हे ५०००० रुपयांपेक्षा जास्त असेल तिथे ई-वे बील निर्माण करण्याची जबाबदारी ही वाहतूकदारांची असते. 

ई-वे बीलाची वैधता ही वस्तूंच्या वाहतूकीच्या अंतरावर अवलंबून आहे.

१. १०० कि.मी. पेक्षा कमी अंतर असेल तर ई-वे बील हे संबधित तारखेपासून एका   
   दिवसासाठी वैध असेल.                                                
२. त्यानंतर प्रत्येक १०० कि.मी. साठी संबधित तारखेपासून एका दिवसासाठी वैध          असेल. 

      संबधित तारीख म्हणजे ई-वे बील निर्माण केल्याची तारीख होय.  आणि एक दिवस म्हणजे चोवीस तास होय.

No comments:

Post a Comment